गणेश दूध संस्थेच्या वतीने विद्यार्थांना टिफीन बॅग व टिफीन चे वाटप

1 min read

राजुरी दि.२७:- राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३७५ विद्यार्थ्यांना टिफिन बॅगसह टिफिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन सुभाष औटी यांनी दिली. सामाजिक व शैक्षणिक कार्यात सत्तेत सतत अग्रेसर असलेल्या राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था व हिंदुस्तान फीड्स या कंपनीच्या सी.एस.आर.फंड योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले.हिंदुस्तान किड्स कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर रवींद्र पवार,सेल्स मॅनेजर गोकुळ कापकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व दूध उत्पादक गवळी यांना मार्गदर्शन केले. वेळी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी,युवा नेते वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे चेअरमन एम.डी.घंगाळे, दिलीप घंगाळे, बाळासाहेब हाडवळे लक्ष्मण घंगाळे, गोविंद औटी, तुकाराम डुंबरे, सुधीर डुंबरे, किसन गुळवे, साईनाथ हाडवळे, संजय औटी, ज्ञानेश्वर घंगाळे, विक्रम डोंगरे, ज्योती हाडवळे, सुवर्णा औटी मुख्याध्यापक सयाजी हाडवळे संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे यांच्यासह शिक्षक, दूध उत्पादक गवळी बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक निलेश हाडवळे यांनी केले तर सूत्रसंचालन गंगाराम औटी केले आभार मोहन हाडवळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!