बोरी बुद्रुक येथे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
1 min read
बोरी दि.२७:- राजर्षी शाहू महाराज म्हणजे बहुजन मागास समाज उद्धारक, शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रसंगी त्यांनी सक्तीचे शिक्षण, गरीब मुली मुलांसाठी वसतिगृह, वाईट आणि कु प्रथा दूर होण्यासाठी प्रसंगी राजादेश काढून लोकाभिमुख शासन राबविले.
असे मत मुंबईचे माजी सहाय्यक पोलिस आयुक्त, बोरीचे नागरिक असलेले संभाजी कोरडे यांनी शाहू महाराज जयंती प्रित्यर्थ आपले मनोगत व्यक्त केले.बोरी बुद्रुक, जुन्नर येथे राजर्षी शाहू महाराज जयंती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी भीमाजी जाधव यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शाहू महाराज हे समाजाभिमुख, वंचितांसाठी काम करणारे राजे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड ला जाण्यासाठी शीष्यवृती देऊन त्यांनी त्याच्या शिक्षणासाठी हातभार लावला.बोरीचे ऐतिहासिक महत्व आणि परिसरात पुरातन बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले बोरी गावचे वैशिष्ट्य,
विविध जाती पंथातील लोक विविध व्यवसायांच्या माध्यमातून गावगाड्याच्या उपयोगी आणि महत्त्वाचे होते. कमी गर्दी पण दर्दी असे मार्मिक वर्णन या प्रसंगी बोरी गावचे माजी सरपंच, विघ्नहर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध कवी,लेखक निवृत्ती कोरडे यांनी शाहू महाराज आणि भीमा यांच्यावरील स्व लिखित कविता वाचन केले.या प्रसंगी बोरीगावातील माजी सरपंच व भीमा यांच्या स्नुषा वैशाली जाधव, विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक तबाजी शिंदे, कवी, लेखक निवृत्ती कोरडे, माजी सरपंच गंगाराम औटी,
मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त संभाजी कोरडे, ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन पटाडे, विद्यमान अध्यक्ष माऊली जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अशोक घोलप,
निवृत्त सरकारी अधिकारी शांताराम जाधव, अनिल कोरडे, रंगनाथ जाधव, बबन कोरडे, हभप भिकाजी जाधव, बशीर भाई,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी भीमाजी जाधव यांना सन्मानपत्र देऊन यथोचित गौरविले.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन दिनेश जाधव व शैलेश कोरडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
