शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रीतम मुंजाळ तर उपाध्यक्षपदी वैशाली मटाले
1 min read
बेल्हे दि.२७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ शाळेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड काल नवनिर्वाचित सदस्यांमधून करण्यात आली. यामध्ये प्रीतम सिताराम मुंजाळ यांची अध्यक्षपदी व वैशाली मोहन मटाले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये वर्गवार पालक मेळावा घेऊन.
सदस्यपदी प्रज्ञा शर्मा, सोहेल बेपारी, सुवर्णा कदम ईश्वर पिंगट, पायल सोनवणे, गोरक्षनाथ शिरतर ,शेखर पिंगट, स्वाती कोकणे, रेश्मा बनकर, नसरीन पठाण, प्रशांत औटी या सदस्यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी विद्यमान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोयल बेपारी, सदस्य मनीषा बांगर हे उपस्थित होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. विद्यमान अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानत ऋण व्यक्त केले.
उपशिक्षक हरिदास घोडे व संतोष डुकरे यांनी संपूर्ण निवड प्रक्रियेचे नियोजन केले.सर्व सदस्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात सर्व निवड प्रक्रिया पार पाडल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे व पालकांचे आभार मानले.
