मंचर बाजार समितीत ७२६१ कांदा पिशवी आवक

1 min read

मंचर, दि.२६:- मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक पावसामुळे घटली आहे. व बाजार भाव स्थिर आहेत. मंगळवार, दि. २४ रोजी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला २११ रुपये, असा उच्चांकी बाजार भाव मिळाला. एकूण ७२६१ कांदा पिशवी कांद्याची आवक झाली. अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.मंचर बाजार समितीत कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये १९०ते २११ रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १७०ते १८०रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १५० ते १७०रुपये, गोल्टी कांद्यास ११०ते १४०रुपये, बदला कांदा व चिंगळी कांद्यास ३० ते १०० रुपये. असा बाजारभाव मिळाला. अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!