शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याने केला १० वी तील विद्यार्थ्यांचा चाकूने खून
1 min read
अहिल्यानगर दि.२६:- अहिल्यानगरच्या सीताराम सारडा विद्यालयातील ही घटना आहे.सर्जेपुरा भागात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद आहेत.त्यावरून पोलिसांत तक्रारी झाल्या आहेत.या दोन्ही कुटुंबातील मुले सीताराम सारडा विद्यालयात शिकतात. या मुलांमध्ये वाद उफाळून आला.
८ वीत शिकणाऱ्या मुलाने दुसऱ्याच्या पोटात सोबत आणलेल्या चाकूने वार केला.त्यात जखमी झालेल्या १० वीतील मुलाचा मृत्यू झाला. दोन्ही मुले अर्थातच अल्पवयीन आहेत.त्या प्रमाणे पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी शाळेत गर्दी केली होती.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी याच शाळेत मुख्याध्यापक असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.मुले व्यसनाधीन होऊ नयेत, म्हणून शाळेच्या जवळ गुटखा, तंबाखू विक्री नसावी असावी त्यांची भूमिका होती.
त्यामुळे त्यांनी तक्रार करून टपरी हटवायला लावली होती.त्याच रागातून त्यांच्यावर हल्ला झाला होता.त्याच शाळेत आज एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा खून केला.
