स्व. वल्लभ बेनके यांच्या ७६ व्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
1 min read
उंब्रज दि.२४:- जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते ना. स्व. वल्लभ बेनके यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २३ रोजी यशवंतराव चव्हाण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रामपंचायत उंब्रज नं. १ व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उंब्रज नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभूतपूर्व असे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पार पडले.सदर कार्यक्रमात बोलताना आमदार अतुल बेनके यांनी आवाहन केले की ‘येणाऱ्या काळात आपल्या भागातील विशेषतः महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करावे आणि त्यासाठी हवी ती मदत करण्यास मी तत्पर आहे’.
स्व. वल्लभशेठ बेनके यांचा लोकसेवा हाच एकमेव ध्यास आयुष्यभर होता. गरजूंना मदत करण्यावर त्यांचा विशेष भर असायचा आणि त्यातूनच अनेक उपक्रम त्यांनी राबविले होते. त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे दरवर्षी नित्यनेमाने आयोजित केले जाणारे आरोग्य शिबीर. हाच उपक्रम आजही त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यापक स्वरुपात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला होता.
