वारकरी व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश बोरी – पंढरपूर मुक्कामी एसटी बस सेवा सुरू
1 min read
आणे दि.२३:- बोरी, साकोरी गावातील वारकरी, ग्रामस्थ साधारण ५ वर्षापासून पंढरपूर एसटी बस सुरू होण्यासाठी प्रयत्न करत होते. पंढरपूर एसटी बस सुरू होण्यासाठी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा, माजी आमदार अतुल बेनके,
आमदार शरद सोनवणे यांच्याकडे वारंवार मागणी करत होते. सदर प्रयत्नांना चालू वर्षी यश मिळाले मिळाले आहे. आजपासून दि.२३ पासून वारकरी,भाविक यांच्या सोयीसाठी नारायणगाव आगाराची बोरी -साकोरी -बारामती -पंढरपूर मुक्कामी एसटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
सदर एसटी बस सुरू करण्यासाठी बालाजी सूर्यवंशी (आगार व्यवस्थापक) यांचे सहकार्य लाभले.सदर बसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे- बोरी-सकाळी ०९:३० बोरी येथून सुटते, वा.तांबेवाडी -बेल्हे, साकोरी, अळकुटी- निघोज -शिरूर- न्हावरे -चौफुला -सुपा -बारामती- लासुर्णे – बावडा -अकलूज- पंढरपूर मुक्कामी.
व पंढरपूर सकाळी ०६:३०वा. अकलूज- लासुर्णे- बावडा- बारामती -सुपा -चौफुला -न्हावरे- शिरूर -निघोज -आळकुटी -बेल्हे- साकोरी -बोरी -जांबुतफाटा- भोरवाडी -नारायणगाव अशी येते.तरी परिसरातील भावीक, वारकरी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, प्रवाशी यांनी सदर एसटी बस मध्ये प्रवास करण्यात यावा अशी माहिती सुनील जाधव सामाजिक कार्यकर्ते बोरी यांनी दिली.
