आळेफाटा येथे शाळेजवळ व कालव्यात अज्ञात व्यक्ती टाकता येत कचरा; पाणी प्रदूषण तर विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात
1 min read
आळेफाटा दि.२४:- आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ तसेच पिंपळगाव जोगा कालव्यात अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.आळेफाटा (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळगाव जोगा कालव्याच्या कडेला असुन.
या ठिकाणी दररोज रात्री अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटुन कचरा कुंडीचे स्वरूप आल्याचे दिसुन येत आहे. तसेच या ठिकाणी आलेल्या पिंपळगाव जोगा कालव्यात देखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे.
पुणे – नाशिक हायवे लगत अज्ञात रहिवाशी तसेच अज्ञात दुकानदार या पिंपळगाव जोगे कालव्यामध्ये कचरा टाकतात त्यामुळे कालव्याच पाणी प्रदूषित होत आहे.आळेफाटा या ठिकाणी मोठी बाजारपेठ असुन ग्रामपंचायत हद्दीतील सगळा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र यंत्रणा (घंटागाडीची) सोय असताना.
देखील या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने सगळीकडे कचराच दिसत आहे. तसेच ज्या ठिकाणी हा कचरा साचत आहे. त्याच्या काही फुटांच्या अंतरावर शिवछत्रपती विद्यालय व जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा असुन या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत असुन.
या कच-याचा ढीगा यामध्ये प्लॅस्टीक, शिळे अन्न कुजलेल्या अवस्थेत पडलेले असुन या ठिकाणी घाण वास येत असुन यांचा त्रास या ठिकाणी येत असलेल्या मुलांना होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असुन या शाळेत प्रवेश करत असताना विद्यार्थ्यांना दररोज नाकाला रूमाल लावुनच प्रवेश करावा लागतो आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली असुन पावसाचे पाणी या कच-यात साचत असल्याने हा कचरा सडु लागल्याने या परीसरात रोगराईचे प्रमाण वाढणार आहे तसेच जे नागरीक कचरा टाकत आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक सुरेश गडगे यांनी केली आहे.
——-
प्रतिक्रिया
या ठिकाणी ग्रामपंचायती ची गाडी वेळेवर जात आहे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने येथे कचरा टाकू नये असा सुचनाफलक लावला आहे. तरीही स्थानिक का कचरा टाकतात असा प्रश्न निर्माण होत आहे. या पुढे कचरा टाकताना आढळल्यास मोठ्या स्वरूपाचा दंड आकारला जाईल.
रेलिका जाधव
सरपंच वडगाव आनंद
