विशाल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे NIPER परीक्षेत डंका
1 min read
आळेफाटा दि.२३:- विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे (ता. जुन्नर) येथील विद्यार्थ्यांनी नायपर (NIPER) २०२५ अखिल भारतीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षद संदीप ईचके याने AIR-111, सईद उमर पठाण याने AIR-313,
तर प्रतिक्षा डी. काशीद हिने AIR-1552 असा उल्लेखनीय अखिल भारतीय क्रमांक मिळवून संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. या परीक्षेस देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. NIPER संस्था ही फार्मास्युटिकल क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते,
आणि या संस्थेच्या प्रवेश परीक्षेत मिळवलेले यश हे फार्मा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. या यशामुळे विशाल इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तेचा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा प्रत्यय आला आहे. या वाटचालीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.डी गायकवाड, प्राचार्य डॉ. एस.एल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्यात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून सर्वांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेली मेहनत, सातत्य व संस्थेचे मार्गदर्शन याचे हे फलित आहे. या यशामुळे संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले असून
हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
