आळे येथील फार्मसी महाविद्यालयात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

आळेफाटा दि.२३:- आळे येथील विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या थीमसह साजरा केला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रतिभा स्मृती सभागृहात पार पाडला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएम आरटी) चे संशोधक तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक सचिन शेरकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा शेरकर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका उपस्थित राहून त्यांनी योग दिवसाचे महत्व सांगितले. तसेच योग साधनेचे मूळ उगम स्थान हे भारत देश आहे. उत्तम आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे. हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. व त्यांना वेगवेगळे योगासने शिकविण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थांनी उत्साहात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे सचिव विजय पारखे, खजिनदार शिवाजी बांगर, विश्वस्त दिलीप चासकर, सीईओ डॉ. दुश्यंत गायकवाड हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.धनश्री गिते यांनी केली. प्रा.शिल्पा कोल्हे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे