श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पैसे मागितल्यास कारवाई:- दिलीप वळसे पाटील
1 min read
घोडेगाव दि.२३:- श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी नेहमी येत असतात, येथील असे सुरू असलेले बेकायदेशीर प्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या असल्याचे माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी मंचर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
भीमाशंकर येथे काही खासगी एजंटकडून दर्शनासाठी अवास्तव पैसे घेतले जातात, तर काही खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्या मंदिरापर्यंत नेण्यासाठी पैसे उकळतात.या प्रकारांमुळे देवस्थानची व आपल्या भागाची बदनामी होत आहे. यापूर्वीही याबाबत देवस्थान व प्रशासनाला सूचना केल्या होत्या;
मात्र यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. आता पोलीस प्रशासनाला याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोणी असले तरी त्याला सोडू नका, गुन्हे दाखल करा व भीमाशंकरमध्ये सुरू असलेले गैरप्रकार तत्काळ थांबवा, असे मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील यांनी सांगितले.
