सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल येथे योगाचे प्रशिक्षण

1 min read

राजुरी दि.२३:- अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राजुरी येथील सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल येथेही योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या योग दिवसाचेऔचित्य साधून पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावीच्या 200 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही योग प्रात्यक्षिकांची अनुभूती घेतली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे,उपमुख्याध्यापिका रिजवाना शेख, क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न झाले. मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्रतिपादित करून नियमित योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले. शाळेच्या योगशिक्षिका अश्विनी पाचपुते यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योग असणे प्रात्यक्षिकांसह करून घेतली व प्रत्येक आसनाचे महत्त्वही समजून सांगितले. शाळेच्या शिक्षिका सीमा पाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळेचे विश्वस्त सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे, उपमुख्यध्यापिका रिजवाना शेख, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका सुप्रिया गुंजाळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध योगासनांसह सूर्यनमस्कार प्राणायाम यांचाही सराव केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!