पुष्पावती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
1 min read
डिंगोरे दि.२३:- डिंगोरे (ता.जुन्नर) संपूर्ण जगात २१ जून हा दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन आयोजित केले होते. यासाठी मार्गदर्शनक म्हणून ओतूर मधील प्रसिद्ध कवयित्री, योगाचार्य, नारदीय कीर्तनकार डॉ. रश्मी घोलप या उपस्थित होत्या.
योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. शरीर व मन यांच्या आरोग्याचा समन्वय ठेवण्याचं काम योगसने करीत असतात. शरीराप्रमाणे मनाची तंदुरुस्ती सुद्धा आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जगामध्ये आपल्याला योगासने तारू शकतात. अशा प्रकारचे प्रतिपादन डॉ.रश्मी घोलप यांनी केले.
त्यांनी आपल्या योगाच्या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांकडून ताडासन ,गोमुखासन, भुजंगासन, नौकासन, त्रिकोणासन, पद्मासन ही आसने करून घेतली. याचबरोबर प्राणायमातील अनुलोम-विलोम भ्रामरी, उज्जयी , कपाल भारती या प्राणायमांच्या क्रिया विद्यार्थ्यांकडून सहजतेने करून घेतल्या..!!!
याच बरोबर विद्यार्थ्यांच्या आहाराविषयी, आरोग्याच्या काळजी घेण्याच्या बाबत, मुलींचे मासिक आरोग्य व त्याबाबत घेण्याची काळजी, याबाबतही मार्गदर्शन केले. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन मंगेश कोंडार , विजय काकडे साधना तांबे ,गोल्हार मॅडम वैभव देशमुख ,दिनेश पाटील व किसन भुतांबरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय घोलप यांनी केले व आभार दीपा सावंत यांनी मानले.
