चैतन्य विद्यालयात योग दिन साजरा;शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा:- डॉ. अमित काशिद

1 min read

ओतूर दि.२३:- ओतूर (ता. जुन्नर) ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगाचे महत्त्व व उपयोग डॉक्टर अमित काशीद यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.दरवर्षी योग दिन का साजरा केला जातो. २१ जून हा दिवस योग दिन साजरा करण्यासाठी निवडण्यात आला कारण तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस योगासाठी प्रतिकात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण तो जागरूकता आणि आध्यात्मिक ऊर्जेचा काळ मानला जातो.या वर्षीचा योग दिन एका विशेष थीमवर साजरा केला जातो आहे. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आंतरिक शांती आणि संतूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी योग महत्त्वाचे आहे. योग केल्याने शरीर सुदृढ, मन प्रसन्न, निरोगी आरोग्य, एकाग्रता वाढते. असे मार्गदर्शन डॉ. अमित काशीद यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.भुजंगासन,वज्रासन, पद्मासन, सूर्यनमस्कार, ताडासन, शवासन मलासन, भ्रामरी, कपालभाती, आदी योगासनांची डॉक्टर अमित काशीद, शुभांगी काशीद ,रवींद्र ढमाले यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, राजाराम शिंदे, संतोष सोनवणे, अमित झरेकर, मिलिंद खेत्री, देवचंद नेहे, विजया गडगे, सोनाली माळवे, आशा गाडेकर, ईश्वर ढमाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यकमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संतोष कांबळे यांनी केले व आभार अमित झरेकर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!