गुरु -शिष्य व मित्रांचा वाढदिवस ठरला विद्यालयाला लाभदायक
1 min read
बेल्हे दि.१९:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे- सुलतानपूर येथील विद्यालयाचे उपक्रमशील व कार्यक्षम मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योजक सुनील दामोदर भोर व उद्योजक मधुकर शंकर मांडे या दोन वर्ग मित्रांनी बोऱ्हाडे सरांच्या शाळेला मदत करण्यासाठी
दोन सायकली भेट दिल्या. सुनील भोर यांचाही वाढदिवस विद्यालयाला मदत करून साजरा झाला. मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांनी आईच्या स्मृती पित्यर्थ 5000 रुपयांची ठेव एसबीआय बँकेत ठेवली आहे. गावच्या माजी सरपंच चंद्रभागाबाई व दोन्ही मुले अविनाश व रोहित खिलारी यांनीही वडिलांच्या स्मृती
पित्यर्थ 5000 रुपये बँकेत ठेवलेली आहे. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या गावात येऊन विद्यालयासाठी व गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी जी कामे केली त्यामध्ये 39 हजार रुपयाचा आर्थिक योगदान त्यांनी दिलेल आहे. हा आदर्श अजित खिलारी व माजी सरपंच व विद्यमान सदस्या मालन दीपक सोनवणे यांनाही आवडला
व बोऱ्हाडे सरांची प्रेरणा घेऊन या दोघांनीही एक – एक सायकल सरांच्या वाढदिवशी विद्यालयाला भेट दिलेली आहे. ज्यांच्यामुळे मी इंग्रजी शिकलो. व आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या शिक्षण प्रणालीमध्ये सदस्य म्हणून काम करता आले. ते मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही कार्यक्षमपणे काम करता आहे.
त्यामागे महेंद्र बोऱ्हाडे यांची सदोदित प्रेरणा होती व त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श आमच्या पुढे होता. म्हणून तुम्ही ज्या शाखेत शिकवत आहात तेथे पंचवीस हजार रुपयांची ठेव मी मोठ्या आनंदाने देत आहे असे म्हणणारे शिवसेना सचिव वैभव मारुती थोरात यांनीही मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांचा वाढदिवस दानधर्म करून साजरा केला.
तसेच पुण्याचे उद्योजक दिनकर खिलारी यांच्याकडूनही सर्व विद्यार्थ्यांना चारशे वह्या वाटण्यात आल्या. तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक व फायनल सम्राट संतोष शंकर सातपुते यांनीही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांचा आवडता माझी विद्यार्थी असल्यामुळे विद्यालयाला पाच सायकली भेट दिल्या.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त विद्यालय अंतर्गत वॉटर फिल्टर 80 पाण्याच्या स्टील च्या बॉटल्स दिल्या. पाठीमागील वर्षीही संतोष सातपुते यांनी विद्यालयाला 75 हजार रुपयाचे एलईडी संच उपलब्ध करून दिलेले होते. मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांनी गेले अडीच महिन्यामध्ये शिरोली सुलतानपूर
च्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व दुसऱ्या शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी चार ते पाच वेळा तसेच शालेय व्यवस्थापनच्या कमिटीला घेऊन व ग्रामपंचायतच्या सदस्यांना घेऊन भेटी दिल्या त्यामुळे नऊ नवीन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश वाढलेले आहेत. म्हणूनच शाळेच्या पहिल्या दिवशी लांबून येणाऱ्या
व नवीन शाळा प्रवेश झालेल्या नऊ विद्यार्थ्यांना नऊ सायकल्स व 35 हजार रुपयांची देणगी ठेव प्राप्त झालेली आहे. असे एक लाख रुपये किमतीचे साहित्य व ठेव /देणगी मिळाल्यामुळे बोऱ्हाडे सरांच्या कर्तृत्वाकडे व धाडसी निर्णयाकडे पाहून शिरोली- सुलतानपूर तसेच पुणे -मुंबईचे उद्योगपती व शिक्षण प्रेमी शिरोलीच्या
सर्व ग्रामस्थांकडून व सर्वच माजी विद्यार्थ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आज शिक्षण प्रेमी ग्रामस्थांच्या, दानशूर उद्योजकांकडून व संस्थेच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल शिरोली (बोरी) या विद्यालयाची भरभराट व प्रगती अत्यंत वेगाने होत आहे.
