सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात तरूण वाहून गेला; इतर पर्यटकांच्या सतर्कतेने थोडक्यात बचावला

1 min read

कोल्हापूर दि.२३:- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. काही अति उत्साही पर्यटकांमुळे या धबधब्यांच्या ठिकाणी अपघात घडताना पाहायला मिळतात. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे एक पर्यटकाने सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. तो वाहून जात असताना दैव बलवत्तर म्हणून तेथील पर्यटकांनी त्याला वाचवलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून यामुळे येथील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा सुद्धा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याला प्रवाह जास्त आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येथे गर्दी करत असतात. काहीजण धबधब्यात उतरून हुल्लडबाजी करताना देखील पाहायला मिळतात. काल या धबधब्यात एका पर्यटकाने सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला आणि यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहून जाऊ लागला. याचवेळी येथील काही पर्यटक त्वरित त्या तरुणाच्या मदतीसाठी पुढे सरसावले. मात्र पाण्याला प्रवाह असल्याने आणि बचावासाठी कोणतेही यंत्रसामग्री नसल्याने वाहून जाणाऱ्या व्यक्तीस बचाव करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मात्र दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांनी मोठ्या अडचणीत वाहून जाणाऱ्या त्या तरुणासा बाहेर काढलं. मात्र ज्या मोबाईल मध्ये तो सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला होता, तो मोबाईल वाहून गेला. धबधब्यांना प्रवाह जास्त असल्याने पर्यटकांनी स्वतःचा जीव सांभाळून पर्यटन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!