गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या पालखीचे शिरोली सुलतानपूर येथून प्रस्थान
1 min read
आणे दि.२२:-जुन्नर तालुक्यातील शिरोली (सुलतानपूर) येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारीसाठी मोठ्या थाटामाटामाटात ज्ञानोबा तुकाराम, विठोबा रखुमाई, अभंगाच्या तालावर,मृदुंग टाळ वीणापताका सह जल्लोषात प्रस्थान झाले.
याप्रसंगी हभप सहादू बाबा वायकर, कोंडाजी बाबा डेरे, रावजी बाबा जाधव या विभूतींच्या कार्यक्षेत्रातील त्यांचे चाहते, त्यांच्याबरोबर हरि किर्तनात दंग होणारे, ज्यांच्या जीवनाचे कल्याण झालेली पुढील पिढी मोठ्या आनंदाने दिंडी सोहळ्यात सहभागी झाली आहे.
शिरोली सुलतानपूर, साळवाडी, निमगाव सावा, औरंगपुर व पारगाव या ठिकाणावरून बहुसंख्य वारकरी पहिल्या दिवसापासून सहभागी झाले आहेत.प्रारंभी च उद्योजक संतोष सातपुते यांचे हस्ते अभिषेक आणि पूजा संपन्न झाली. सदर प्रसंगी विष्णु डावखर, शिवनेर भुषण सुदाम महाराज बनकर,
माजी सरपंच जयसिंग गुंजाळ, सरपंच प्रिया खिलारी, सदर प्रसंगी आळंदी येथील गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे या धर्मशाळेचे अध्यक्ष हभप यशवंतराव लांडगे यांच्यासह शेकडो वारकरी उपस्थित होते.पायी पालखी सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून वारकऱ्यांना गेल्या वर्षी डेरे बाबांची नित्यनेम भजनी मालिका सोहळा
कमिटीचे सचिव शिवराम गुंजाळ यांनी दिल्या होत्या.तर यावर्षी पालखी सोहळ्यास अनेक मान्यवरांनी चहा नष्टा दिला दुपारचे व अन्नदाते बाबुराव रामभाऊ पाबळे – पिंपरीकावळ या ठिकाणी संपन्न व या सोहळयाचा पहिला जांबुत या ठिकाणी होता.
या सोहळ्याला सहभागी होणारासाठी कमिटी मार्फत नित्यनेम भजनी मालिका प्रत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज डावखर व उपाध्यक्ष चिमाजी सखारम गाडगे यांनी जहिर केले व या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले होते.
