सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंगमध्ये योग दिन उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.२२:- राजुरी ता.(जुन्नर ) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे खजिनदार सचिन चव्हाण यांनी सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. बलराम यांनीही सर्वांना मार्गदर्शन करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योगाचे महत्व सांगताना म्हणाले की योग ही एक साधना असून सातत्यपूर्ण सराव केल्यास मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. योगसाधना ही भारताने जगाला दिलेली आरोग्य संजीवनी आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय योग साधना आयुर्वेद याचे अनुकरण केले जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागे योग आणि प्राणायाम याचे सुंदर आणि नैसर्गिक उपयोजन सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी. तसेच जागतिकी करणामुळे आरोग्यसमोर निर्माण झालेल्या आव्हान कमी करणे हा हेतू आहे. क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय व भारत सरकार, पुणेयांच्या योग मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवार दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!