श्री बेल्हेश्वर मध्ये योग दिन उत्साहात
1 min read
बेल्हे दि.२२:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतल्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र पडवळ यांनी दिली.
विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत पादीर यांनी योगासनांच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तुषार नांगरे यांनी योगासनांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व विषद केले. क्रीडा शिक्षक सदानंद भवारी यांनी प्राणायममधील अनुलोम-विलोम,
कुंभक रेचक आदी क्रिया समजावून सांगितल्या. मंद संगिताच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थी योगासने करण्यात मग्न होऊन गेली होती. कला शिक्षक प्रताप चिंतामणी यांनी शीर्षासनासारखी अवघड योगासने लीलया सादर केली. उपशिक्षक बाळासाहेब गावडे यांच्या हास्ययोगाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
