केवळ 20 रुपयांत 2 लाख पर्यंतचा विमा, सरकारच्या ‘ह्या’ योजनेबाबत तुम्हाला माहित आहे का ?

1 min read

पुणे दि.२२:- आपलं आयुष्य धकाधकीचं आणि अनिश्चिततेनं भरलेले आहे. केव्हा आणि कोणासोबत काय घटना घडेल, हे इथे काहीही सांगता येत नाही. अनपेक्षित घटनांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी लोक विमा पॉलिसी घेतात. परंतु खरेदी करण्यासाठी सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नसतात. सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. ही एक अपघात विमा पॉलिसी आहे. या पॉलिसी द्वारे अपघातात मृत्यू व गंभीर दुखापत झाल्यास तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता. 18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणता ही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजने अंतर्गत दरवर्षी 20 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जे तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होतात. दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर किंवा पूर्णतः विकलांग झाल्यानंतर 2 लाख पर्यंतच्या क्लेम मिळतो. दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळतो. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.jansuraksha.gov.in/ वर जावे लागेल. पुढे तुम्हाला योजनेचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. तुमची योग्य माहिती त्यात टाकावी लागेल. तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित कागदपत्र आणि फॉर्म सबमिट करावा लागेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!