मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
1 min read
निमगाव सावा दि.२२:- येथील वर्षा व विजय गाडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कन्येच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत आहेत.
यावर्षी त्यांच्या या उपक्रमाला तब्बल 12 वर्षे म्हणजेच एक तप पुर्ण झाले आणि म्हणूनच या तपपूर्ती निमित्त या दांपत्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त निमगाव सावा गावातील दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास 225 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे
शैक्षणिक साहित्य मग त्यामध्ये वह्या, पेन्सिल, रबर, शार्पनर, स्केल आदी साहित्याचे वाटप करून आपल्या कन्येचा वाढदिवस साजरा केला. हा कार्यक्रम दोन्ही जिल्हा परिषद शाळांच्या प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पारगाव गावचे ग्रामनेते संभाजी चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर गाडगे,
संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तसेच सरपंच किशोर घोडे, प्रकाश चव्हाण, प्रशांत तट्टू, संपत डुकरे, फापाळे, ह.भ.प.विजय महाराज खाडे, मा.उपसरपंच नजीर चौगुले, चंद्रकांत जावळे गुरूजी, परेश घोडे, सलिम पटेल, चंदा गाडगे, सीमा भालेराव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान पटेल,
सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालकवर्ग व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. सर्वांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साळूंके गुरूजी यांनी केले तसेच भास्कर गाडगे, संभाजी चव्हाण, विजय महाराज खाडे,
चंदा गाडगे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य गोफणे तसेच सर्व शिक्षकवृंदांचे मोठे सहकार्य लाभले.यापुढे देखील हा उपक्रम सुरू राहील याची खात्री या दांपत्याने दिली. चिमुकल्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
