विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक योग दीन उत्साहात साजरा
1 min read
साकोरी दि.२२:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी आणि पी.एम.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यालयातील ज्यूनिअर के जी ते इयत्ता १२ वी च्या एकूण ७०० विद्यार्थांनी एकाच वेळी योगासने शिकण्याचा आनंद घेतला.
या योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील क्रीडाशिक्षक गौरव लबडे यांनी विद्यार्थांना योगासनांचे प्रकार करून दाखवले व योगासनांचे प्रकार व महत्व पटवून दिले.योगा केल्याने मन अधिक तीक्ष्ण आणि आरामशीर होण्यास मदत होते. योगामुळे रक्ताभिसरण आणि आपल्या शरीरातील आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
योगामुळे शारीरिक व मानसिक तसेच अध्यात्मिक स्वास्थ्य टिकून राहते.नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव आणि शरीरातील जळजळ कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.उच्च रक्तदाब आणि जास्त वजन यासह हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांवरही योगाद्वारे उपाय करता येतो.
म्हणून विद्यार्थांनी नियमित योगासने व व्यायाम करावा असे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गणेश करडीले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.यावेळी संस्थेचे संस्थापक मा.पी.एम.साळवे, प्राचार्या रुपाली पवार (भालेराव),
प्राचार्य रमेश शेवाळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.एम.साळवे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
