जुन्नर येथे ४० दुचाकीस्वारांकडून ६० हजारांचा दंड वसूल

1 min read

जुन्नर दि.२२:- जुन्नर शहरातील सात आठ बुलेट दुचाकीवर मोठ्या दंड रकमेची कारवाई करण्यात येऊन त्यांचे मोठे आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त ४० दुचाकी चालकांवर दंड रकमेची कारवाई करण्यात आली. बुलेट व इतर ४० दुचाकी चालकांवर कारवाई होऊन ६० हजार ५०० रुपये दंड रकमेची कारवाई दोन दिवसात करण्यात आली.जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वाहतूक पोलीस विभागाला कारवाईचे आदेश दिले. वाहतूक पोलीस अंमलदार दीपक वनवे, दादाभाऊ पावडे, आरसीपी पथक, ट्रॅफिक वॉर्डन यांनी जुन्नर परिसरात बेशिस्त दुचाकी चालकांवर कारवाई केली. यामध्ये बुलेट दुचाकीचे मूळ सायलेन्सर काढून तेथे मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या बुलेट चालकांवर करवाई करण्यात आली. सात ते आठ बुलेट चालकांनी त्यांचे बदललेले सायलेन्सर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. त्यांच्यावर २० हजार रुपये दंड रकमेची कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे विविध नियम न पाळणार्या दुचाकी चालकांवर यावेळी नियमानुसार कारवाई होऊन ४० दुचाकींवर दंड रकमेची कारवाई करण्यात आली. २ दिवसांत अशा बेशिस्त दुचाकी चालकांवर ६० हजार ५०० रुपये दंड रकमेची कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!