सोमतवाडीत शेतकऱ्याला मारहाण; तिघांना अटक
1 min read
जुन्नर दि.२२:- जुन्नर लगतच्या सोमतवाडी येथील एका हॉटेल मधून जेवण करून पायी जात असताना ३५ वर्षीय शेतकऱ्याला तीन जणांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करीत डोक्यात अंगावर लोखंडी पाइपने मारहाण करून दुखापत केली. आदेश मंडलिक, दिनेश गिरी, प्रसाद मंडलिक (सर्व रा. बेलसर)
यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मंडलिक या शेतकऱ्याने फिर्याद नोंद केली आहे. ते सोमतवाडी येथील एका हॉटेलमधून जेवण करून पायी जात असताना या तिघांनी त्यांना शिवीगाळ,
दमदाटी मारहाण केली. तर आदेश याने लोखंडी पाइपने त्यांच्या डोक्यात पाठीवर मारहाण करीत दुखापत केली. पोलीस अंमलदार संतोष पवार पुढील तपास करीत आहेत.
