तुमचे पेन्शनचे पैसे काढून देतो सांगून एटीएम कार्ड बदलून ३४ हजारांना गंडा

1 min read

जुन्नर दि.२२:- जुन्नरमधील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एसबीआय बँक एटीएममधून तुमचे पेन्शन चे पैसे काढून देतो. अनोळखी तरुणाने त्यांचे एटीएम कार्ड घेऊन चलाखीने त्याची अदलाबदली करीत त्यांचे खात्यामधील ३४ हजाराची रक्कम काढून फसवणूक केल्या प्रकरणी दाखल फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनकर श्रीपत देवकर (वय ७२, रा. कल्याण पेठ, जुन्नर) यांनी फिर्याद नोंद केली आहे. जुन्नर नवीन एसटी बस स्थानकासमोरील बाजार समिती प्रांगणात एसबीआय बँक शाखा असून बँकेबाहेर एटीएम आहे. देवकर हे या एटीएम मध्ये गेलेले असताना त्यांचा मागे उभ्या असलेल्या अनोळखी तरुणाने तुमचे पेन्शनचे पैसे काढून देतो असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्याने चलाखीने कार्डाची अदलाबदली केली.त्यानंतर या तरुणाने त्यांच्या खात्यातील ३४ हजाराची रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार पारधी तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!