शुभम तारांगण सोसायटीच्या रहिवाश्यांना योगाचे धडे

1 min read

आळेफाटा दि.२१:- योग दिनाच्या निमित्ताने आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आरोग्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक ही सर्वात मोठी असते, सोसायटीच्या रहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास हातभार सोसायटीने लावला.

बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील योग प्रशिक्षक प्राध्यापक डॉ. अरुण गुळवे यांनी रहिवाश्यांना व सोसायटीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले. या वेळी महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुभम तारांगण गृह प्रकल्पात नेहमीच विविध कला, सांस्कृतिक,

शैक्षणिक व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी देखील योग दिनाचे औचित्य साधून योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे विविध प्रकार घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष संजय गुंजाळ,

सेक्रेटरी दिनेश अग्रे, शुभम EPC चे मार्केटिंग मॅनेजर उत्तम केदारी, शुभम EPC चे MEP चे मॅनेजर सचिन घोडके, HR शीतल मोगरे, सर्व कर्मचारी, सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!