पालखी आगमनानिमित्त पुणे शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद

1 min read

पुणे दि.२०:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवारी (२० जून) शहरात होणार आहे. पालखी आगमनानिमित्त शुक्रवारी शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामाेशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!