नाणेघाटाजवळ आढळला युवकाचा मृतदेह

1 min read

लेण्याद्री दि.१८:- पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाणेघाटाजवळील दरीमध्ये नवनाथ रामदास कोकणे (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.घाटाजवळच असणाऱ्या अंजनावळे येथे राहणारा नवनाथ रविवार (दि. १५) पासून बेपत्ता होता. शोधकार्य सुरू असताना सोमवारी (दि. १६) १२०० फूट खोल दरीत (भोरंड्याची नाळ) त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह असणारे केवळ ६०० फूटवर आणण्यात यश आले. धुके, जोरदार वारा आणि पावसामुळे रेस्क्यू टीमच्या बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे (दि. १७) दुपारी मृतदेह वर काढण्यात आला. दरम्यान नवनाथ याचा अपघात झाला की आत्महत्या याबाबत जुन्नर पोलीस तपास करत आहेत. बचावकार्यात शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, ओम बिडवई, सुजल बिडवई, संकेत बोंबले, संकेत कबाडी, कपिल कबाडी, बाळू मेमाने, सदानंद मानकर, दिनेश पापडे, हर्ष जगताप, शुभम सरजीने, मगदूम सय्यद, संदीप पारधी, ग्रामस्थांनी मदत केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे