ओतूर येथे सव्वा लाखांचा अवैध हिरडा हस्तगत; वनविभागाची कारवाई
1 min read
ओतूर दि.१८:- जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वन परिक्षेत्र हद्दीत ब्राह्मणवाडा रस्त्यावर सोमवारी (दि. १६) विना परवाना हिरडा मालाची अवैध वाहतूक करणारा पिकअप (एमएच २६, एच ९१९३) वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी पकडून त्यामधील १६८८ किलो वजनाचा हिरडा माल हस्तगत केला आहे. असून त्याची बाजारभाव किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर लहानु मुतडक (वय-३३), गोरख गणपत लहामगे (वय ४६), किरण सुभाष वराडे (वय ४६ तिघे रा. राजुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर)
असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पिकअप हिरडा मालासह जप्त करून ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले.