महिला आयोगाची अध्यक्षा राजकीय पक्षाची नसावी:- तृप्ती देसाई

1 min read

अहिल्यानगर दि.११:- महिलांवर अत्याचार, हुंडाबळी अशा घटना राज्यात दररोज घडत आहे. महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पक्षाची पदाधिकारी नसावी. त्याऐवजी २४ तास काम करणारी व्यक्ती त्याठिकाणी असावी. आज ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या फार वेगळ्या आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला आयोगाच्या सदस्यता देखील नेमल्या जात नाही, ही शोकांतिका असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्ती केली. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. मात्र, महिला आयोग काय करते यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांवरील अत्याचार, हुंडाबळीच्या घटना वाढल्या आहेत. महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पक्षाची पदाधिकारी कशाला असायला हवी, असा टोला ही रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!