जुन्नर महसूल लोक अदालतीमध्ये ४०४ पैकी ८५ प्रकरणांत तडजोड

1 min read

जुन्नर दि.११:- जुन्नर तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महसूल लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या १८६ प्रकरणांपैकी २९ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तर प्रांताधिकारी जुन्नर यांच्या कार्यालयांतर्गत ठेवण्यात आलेल्या २१८ प्रकरणांपैकी ५६ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली, अशी माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्दे शानुसार महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. महसूल विभागातील प्रलंबित दाव्यांमध्ये तडजोडी ने पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळवून देण्याकरिता या अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे एकमत होऊन त्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. नवीन रस्ता मागणी, रस्ता खुला करणे, गौण खनिज, कुळ कायदा प्रकरणे, सातबारा दुरुस्ती, फेरफार दुरुस्ती व अन्य जमीन संदर्भातील दावे कायमचे निकाली काढण्यात आले. नायब तहसीलदार सचिन मुंढे, ए. बी. गवारी, सारिका रासकर, अनिल थोरवडे आदींसह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे