पत्रकारावर हल्ला करणारा आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
1 min read
अहिल्यानगर दि.११:- केडगाव येथील पत्रकारावर जीवेघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.प्रज्ञेश शशिकांत शिंदे (रा. वैष्णवनगर, केडगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव परिसरात एक अज्ञात व्यक्ती गावठी कट्टा घेऊन दहशत करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यानेच केडगाव येथील पत्रकारांवर जीवेघेणा हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात समोर आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली.