टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; दहा प्रवासी जखमी
1 min read
पाथर्डी दि.३:- पाथर्डी तालुक्यातील येळी शिवार येथील कल्याण-विशाखापट्टणम (निर्मल) राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात घडला. पाथर्डीकडे येत असलेल्या प्रवासी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले असून, त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.
अपघात पाथर्डी तालुक्यातील येळी ते भुते टाकळी दरम्यान येळी गावच्या शिवारात घडला. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवासी घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ती पलटी झाली. प्रवाशांना वाहनाबाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली.