बापाने आणलेली दारू मुलगा पिल्याने बापाकडून मुलाची हत्या

1 min read

अमरावती दि.४:- बापाने स्वतःसाठी आणले दारू मुलगा पिल्यामुळे याचा मनात राग धरून बापाने मुलाची हत्या केली आहे. जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा या गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहादा गावातील आरोपी हिरामण धुर्वे (वय ६० वर्षे) आणि त्याचा मुलगा (वय ३२ वर्षे) हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या आहारी गेले होते. ते दररोज दारू पिऊन नशेत घरी परतत असत.घटनेच्या दिवशीही हिरामण धुर्वे याने स्वतःसाठी दारू आणली होती. मात्र, घरी असताना त्याचा मुलगा ती दारू पिऊन झोपून गेला. वडील घरी आल्यावर दारूची बाटली दिसेनाशी झाल्याने त्यांनी चौकशी केली असता, मुलानेच दारू प्यायल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गोष्टीवरून वडील आणि मुलामध्ये वाद निर्माण झाला. आधी शाब्दिक चकमक झाली, आणि त्यानंतर वादाने हिंसक वळण घेतले.झोपेतच काठीने मारहाण रागाच्या भरात असलेल्या पित्याने मुलाच्या झोपेचा फायदा घेत त्याच्यावर काठीने वार केले. या अमानवी मारहाणीत मुलाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घरातून मुलाच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच वरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आरोपी हिरामण धुर्वेला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.या प्रकारामुळे बहादा गावात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे