उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

1 min read

छत्रपती संभाजीनगर दि.२८:- छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना एसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडेच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक झाली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे