खडकी वाळकी परिसरात गंभीर पूर परिस्थिती; लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य

1 min read

अहिल्यानगर दि.२८:- अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत. हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून १० व वाळकी येथून १५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले.हे मदत पथक संध्याकाळी १७:३५ वाजता अरंगगाव येथे पोहोचले आणि तेथील नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पुरग्रस्त भागाकडे रवाना झाले. १७:५० वाजता पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे