वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवींचे नाव; राज्य शासनाची मंजूरी

1 min read

अहिल्यानगर दि.२४:- अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संसदेचे लक्ष वेधणाऱ्या खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाच्या २३ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत खा. लंके यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर ता.६ मे रोजी जिल्ह्यातील चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित ४३० रूग्णखाटांचे रूग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. ता. २३ मे रोजी शासन निर्णय पारीत करण्यात आल्याने या महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे