कृषी सेवा केंद्र लुटणारे तिघे जेरबंद
1 min read
संगमनेर दि.२४:-संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे कृषी सेवा केंद्रात चोरी करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ८ लाख ५७ हजार ३९२ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २३, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर), राज संदीप गायकवाड (वय २४, रा.विळद, ता.अहिल्यानगर),
आदित्य संतोष इंगोले (वय २३, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार आश्वी येथील कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरी करणारा
गणेश आव्हाड याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून ८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड यांच्या पथकाने केली.
