प्रियकरासोबतच आईने अल्पवयीन मुलीचा लावला विवाह; फरार आई व प्रियकरास अटक
1 min read
लोणी काळभोर दि.२४:- जन्मदात्या आईनेच तिचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी तिच्याच ३५ वर्षीय प्रियकराला पोटच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायला लावून या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रियकरासोबतच मुलीचा बालविवाह करून देणारी आई व तिच्या प्रियकराला हैदराबाद मधून पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत घडली आहे.पीडित मुलीची आई (वय ३५) व मधुकर यशवंत गायकवाड (वय ३५, रा. सुगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. पीडित फिर्यादी ही १४ वर्षांची असून ती आईसोबत रहात होती.
मधुकर गायकवाड हा वाहनचालक असून फिर्यादीच्या घरातच रहात होता. डिसेंबर २०२४ मध्ये एका रात्री मधुकर गायकवाड याने फिर्यादीच्या लहान बहीण व भावाला अंमली पदार्थ पाजला. पीडितेने आईला याबाबत सांगितले होते; परंतु आई काहीच बोलली नाही. पीडिता रात्री झोपल्यानंतर मधुकरने बलात्कार केला.
याबाबत पीडितेने आईला सांगितले असता, आईने म्हणाली, त्याला काय करायच ते करू दे, असे म्हणून झोपी गेली. आरोपीने फिर्यादी सोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्यांचा बालविवाह करून दिला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांच्या सहकार्यांचे पथक तयार करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. तेव्हापासून पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर होते.
दोघेही शंकर पल्ली, फतेपूर (हैद्राबाद) येथे असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.
