उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनचे उद्घाटन संपन्न
1 min read
नारायणगाव दि.२४:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) येथील नवीन इमारतीचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी ९ वाजता संपन्न झाले.
यावेळी नवीन इमारतीमधील विविध कक्षांची संबंधितांकडून माहिती घेतली तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि अंमलदार यांना या नव्या वास्तूमधून सर्व समाजघटकांची निःस्वार्थ सेवा करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
