खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

1 min read

पाथर्डी दि.२३:- येथे खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपी गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून एक लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुदस्सर सादीक सय्यद (वय २२ रा.पाथर्डी), सोमनाथ रमेश काळोखे (वय २४, रा.आनंदनगर, पाथर्डी), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार खुनाच्या प्रयत्नातील आरोपी हे माणिकदौंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!