आळे गावातील कत्तलखाना बंद करा, मंदिराजवळचे बोंबील गोडाऊन गावाबाहेर हलवा; ग्रामसभेत ठराव

1 min read

आळे दि.२३:- आळे येथील ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला आळे गावातील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करण्यात यावा हा ठराव तयार करून त्याचे निवेदन आळेफाटा पोलीस स्टेशन व जुन्नर तहसीलदार कार्यालयास देण्यात आले.
आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावचे उपसरपंच मंगेश कु-हाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रितम काळे, माजी पंचायत समितीचे सदस्य नेताजी डोके, जिवन शिंदे, ॲड.विजय कु-हाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र गुंजाळ, किशोर कु-हाडे, दिगंबर घोडेकर, सुधीर लाड, गणेश गुंजाळ, लता वाव्हळ, गणेश शिंदे, मंगल तितर, अर्चना गुंजाळ, गौरी भंडलकर, सोनाली वाघोले, उमेश शिंदे, निलेश शिंदे, रामदास शिंदे, हेमंत वाव्हळ, पप्पू डोंगरे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी झालेल्या ग्रामसभेमध्ये आळे गावच्या गावठाण हद्दीत गेले अनेक वर्षे गोवंश हत्त्या व गोहत्त्या होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पोलिस प्रशासनाने कारवाई करीत गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याने ग्रामस्थांचे ग्रामसभेतील मागणीनुसार तातडीने संबंधित कत्तलखाने बंद होणेकामी व संबंधित इमारत तातडीने जमीनदोस्त करणेबाबत कारवाई करावी असा ठराव करण्यात आला. तसेच गावात असलेला कत्तलखाना तातडीने बंद करणे, गाव हद्दीत असे प्रकार गोहत्या पुन्हा कधीही होवू नये संबंधित कत्तलखाण्याची इमारत पाडण्यात यावी. इतर धर्मीय धर्मांतरासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. गावात असलेल्या मंदिराजवळ जे बोंबील गोडावून मंदिराजवळ आहेत ते गावाबाहेर हलवावेत. बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम करून कायदेशीर कारवाई करावी. उर्दू शाळेतून दिले जाणारे बोनाफाईड दाखले बोगस पद्धतीने वाटप केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे त्याची चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर मार्फत व्हावी. आदी विषयांवर चर्चा करून या संदर्भाचे निवेदन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना देण्यात आले. आळे ग्रामपंचायत या निर्णयाचे जुन्नर तालुक्यात कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे