पाथर्डी शहरात जोरदार पावसाने दाणादाण
1 min read
पाथर्डी दि.१९:- पाथर्डी शहरात सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून टाकली. शहरातील अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे जोरदार वाऱ्यात दुकानांचे बोर्ड पडले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उपनगरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना घरात जाण्यासाठी सुद्धा मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. शहरात झालेल्या पावसाने रस्ते,गटारी यांच्या झालेल्या दैनावस्थेमुळे पाथर्डी नगरपरिषदेचे पितळ उघडे पडले.पावसाळ्यापूर्वी शहरातील सगळ्याच नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे.