जनावरांच्या कत्तलप्रकरणी दोघांवर गुन्हा

1 min read

जुन्नर दि.१९:- जुन्नर मधील खलीलपुरा या भरवस्ती मधील एका घरात गोवंश जनावरांची विना परवाना बेकायदा कत्तल करून त्याचे १०० किलो गोमांस जनावरांची १२ कातडी, हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतलेली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फकीर महमंद कुरेशी व त्यांचा अल्पवयीन मुलगा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंमलदार नागेश वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या दोघांनी घराच्या अंगणात गोवंश जनावरांची कत्तल विनापरवाना केली होती. पथकाने छापा मारून १०० किलो गोमांस जनावरांची १२ कातडी, हत्यारे ताब्यात घेतली. अंमलदार अमोल काळे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!