गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद

1 min read

अहिल्यानगर दि.१८:-जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातून अवैध गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद केला. त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रशेखर जयवंत मखरे (वय ३८, रा.मखरेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा येथे एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, अरूण मोरे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!