मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन

1 min read

बेल्हे दि.१८:- बेल्हे आणि पंचक्रोशीतील सर्व शाळांमध्ये प्रथम आलेल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित केला होता. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लागलेले प्रमुख पाहुणे प्रशांत पादीर यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या वेगवेगळ्या संधी याबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थी व पालकांनी फक्त गुणांकडे न पाहता विद्यार्थ्यांचा मानसिक कल पाहून पुढील शैक्षणिक धोरण ठरवावे तसेच JEE व NEET यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्डाचा अभ्यास करावा. असे आवाहन सर्व पालक व विद्यार्थ्यांना केले. प्राध्यापक जिजाभाऊ घुले यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये सातत्य व संघर्ष याचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच भावनिक व सामाजिक विकास होणे देखील महत्त्वाचे आहे असे मत प्रतिपादन केले. संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या भरगोस यशाबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक व आभार मानले. बेल्हे, राजुरी, बोरी, पारगाव, मंगरूळ, साकोरी, अळकुटी, आळे, आळेफाटा, या शाळांमधील पन्नास हून अधिक विद्यार्थी व पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विद्या गाडगे व सूत्रसंचालन मनोहर पठाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अमित जाधव, आनंद देशपांडे यांचेही अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्या के.पी.सिंह, सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे