व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडीतील दहावीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे यश

1 min read

वडगाव कांदळी दि.१५:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील इयत्ता दहावीची पहिली बॅच यश संपादन करून पुढील वाटचालीस सज्ज झाली आहे. या यशस्वी बॅचमध्ये तन्मय शेंडे याने ८४.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक, सानवी पाचपुते हिने

७७.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर हिमांशू कुतळ याने ७२.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, दहावीचे वर्गशिक्षक अमोल जाधव यांचे व इतर सर्व विषय शिक्षकांचेही कौतुक केले.

विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ गायकवाड सर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे