मातोश्री शैक्षणिक संकुलात ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
1 min read
कर्जुले हर्या दि.१७:- मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित मातोश्री सायन्स कॉलेज, कर्जुले हर्या, ता-पारनेर, जिल्हा-अहिल्यानगर येथे इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या वर्षी इ.११ वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी इ. १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रकियेतंर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात :-१) नोंदणी कशी करावी? २)लॉगीन आयडी व पासवर्ड कसा तयार करावा ? ३)विद्यार्थी प्रोफाईल कसे तयार करावे?४)कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व ती कशी अपलोड करायची ? ५)कॉलेजचा प्राधान्यक्रम कसा निवडावा?याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मातोश्री सायन्स कॉलेज, कर्जुले हर्या येथे मोफत समुपदेशन, मार्गदर्शन व रजिस्ट्रेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
दिनांक – १९ मे २०२५ पासून २८ मे २०२५ संपर्क वेळ – १०.०० ते ०३.०० वा. स्थळ – मातोश्री सायन्स कॉलेज, कर्जुले हर्या, ता-पारनेर, जिल्हा-अहिल्यानगर सोबत येताना खालील प्रमाणे कागदपत्रे घेऊन यावे 1.इ.दहावी परीक्षेचे गुणपत्रक (ऑनलाईन) 2.विद्यार्थी आधार कार्ड 3.पासपोर्ट साईज दोन फोटो.
4.इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला 5.विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला (लागू असल्यास). 6.पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास). 7.नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (लागू असल्यास) 8.दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास). 9.प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास). 10.आजी-माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास).
11.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र (लागू असल्यास). अधिक माहिती साठी संपर्क- राहुल सासवडे सर (9921353512), गणेश हांडे सर (84596 84792)