पंचवीस गुंठे गुंठ्यात फुलवले वांग्याचे पीक; चिवचिव या जातीच्या वांग्यातून हजारोंचा नफा
1 min read
बेल्हे दि.१६:- राजुरी येथील स्वप्निल हाडवळे या तरुण शेतकऱ्याने वांग्याचे पिक घेऊन खर्च वजा जाता पहिल्या चार पाच तोडतातच सात ते आठ हजार रुपयांचा नफा मिळवला आहे.
राजुरी (ता.जुन्नर) येथील स्वप्निल ममताराम हाडवळे या तरूणाने नोकरीच्या मागे न लागता उत्तम प्रकारे शेती करत असुन या तरुणाने आपल्या जवळ असलेल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन चांगला नफा मिळवला आहे.
यावेळी त्यांनी वांग्याचे पीक घेण्याचे ठरवले व यासाठी सुरवातील पंचवीस गुंठे क्षेत्राची या पिकासाठी निवड केली. या क्षेत्रात पहिले जनावरांसाठी हत्ती गवत लावले होते व गवत काढल्या नंतर हे शेत त्यांणी महीणा भर तापत ठेवले. नंतर हे शेताला पाळी घातली व त्यांणी विशेष ठराविक अंतरावर टॅक्टर च्या साह्याने सारे पाडले.

त्यानंतर हाडवळे यांणी चिवचिव या जातीची २५०० रोपे आणुन दोन फुटांच्या अंतरावर लावली. लागवडीनंतर वेळच्यावेळी पाण्यातून जैविक खतांचा मात्रा देण्यात आली. योग्य प्रकारची औषध तसेच खते व फवारणी केल्याने हे पाक चांगले आले असुन आतापर्यंत २ टन माल निघाला असुन बांगर यांना या पिकासाठी फक्त १५ ते २० हजार रूपये खर्च आला
असुन सध्या एका किलोला १३ ते १५ रुपये बाजार भाव मिळत आहे. झालेला खर्च वजा जाता त्यांना आतापर्यंत सात ते आठ हजार रुपयांचा नफा झाला असुन अजुन हे पाच ते सहा महिने चालणार असुन या मधुन त्यांना यामधुन त्यांना साठ ते ऐंशी हजार रुपयांचा नफा अजुन मिळणार अंदाज आहे.

“चिवचिव या जातीच्या वांग्याचे पीक घेत असताना रासायनिक खतांचा वापर न करता फक्त शेणखत व जैविक खतांचा वापर केल्याने पिक चांगले आले असुन व यामध्ये विशेष करून सोलर स्प, फळपोखरी नारीअळीचे ट्रॅप, चिकट सापळ्यांचा वापर व किटकनाशक दशपर्णी अर्काचा वापर करण्यात आला. जैविक खते वापरल्याने माल चांगला निघत आहे तसेच यासाठी वडील ममताराम हाडवळे आई जयश्री व भाऊ संदीप यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.”
स्वप्निल हाडवळे, वांगे उत्पादक शेतकरी

बाजार भाव
सन २०२२ एका किलोस १५ ते ३० रुपये
सन २०२३ एका किलोस २० ते २५ रूपये
सन २०२४ एका किलोस १५ ते २५ रुपये
सन २०२५ एका किलोस १३ ते १५ रुपये

