हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा खात्मा; मसूद अझहर ढसाढसा रडला; म्हणाला भारत आता कुणाची दया करणार नाही
1 min read
नवी दिल्ली दि.७:- पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आलं. दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, भारताच्या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं. तसेच, भारत आता कुणाची दया करणार नाही, असंही मसूदनं म्हटलं आहे.भारताने केलेल्या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा केला.
या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीणही ठार झाली आहे. या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईकही मारले गेले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या पंजाबमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणी हल्ले करण्यात आले.जैश-ए-मोहम्मदनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब मारलं गेलंय. मुफ्ती अब्दुल रौफ यांची नातवंडं, बाजी सादियाचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुलं जखमी झालीत.
कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर आज बुधवारी (7 मे 2025) अंत्यसंस्कार केले जातील. जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा हवाला देत बीबीसी उर्दूनं वृत्त दिलंय की, अझहरचा एक जवळचा सहकारी,
त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी देखील भारतीय हल्ल्यात मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमधील सुभान अल्लाह कंपाऊंडवरही हल्ला करण्यात आला आहे.